कोरेगाव येथील ‘रनर्स फाउंडेशन’तर्फे चॅलेंज फॉर रनिंग, वॉकिंग व सायकलिंग पूर्ण करणार्या स्पर्धकांना बक्षीस वितरण सोहळा 14 फेब्रुवारी रोजी रोटरी गार्डन कोरेगाव येथे संपन्न झाला.
खटाव : कोरेगाव येथील ‘रनर्स फाउंडेशन’तर्फे चॅलेंज फॉर रनिंग, वॉकिंग व सायकलिंग पूर्ण करणार्या स्पर्धकांना बक्षीस वितरण सोहळा 14 फेब्रुवारी रोजी रोटरी गार्डन कोरेगाव येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाचा उद्देश फक्त एवढाच आहे की, प्रत्येक व्यक्तीला व्यायामाची आवड निर्माण व्हावी, तो निरोगी राहावा, शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहावा, तसेच जगभरात थैमान घालणार्या कोरोना सारख्या अदृश्य रोगासाठी निरोगी राहण्यासाठी व्यायाम करून शरीर सुदृढ ठेवावे व निरोगी भारत घडवूया हे संकल्प रनर्स फाउंडेशन कोरेगाव यांनी बाळगले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा हिल मॅरेथॉनचे प्रणेते व उत्कृष्ट धावपटू सुप्रसिद्ध डॉ. संदीप काटे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मानदेश मॅरेथॉनचे संचालक सुप्रसिद्ध डॉ. महेश काटकर व अजित इनामदार, डॉक्टर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात झुम्बा डान्स व डॉ. संदीप काटे सोबत धावणे या उपक्रमाने झाली. धावणे हा उत्कृष्ट व सहजसोपा व्यायाम प्रकार असून त्यासाठी वयाचे बंधन नाही व वयाच्या कोणत्याही टप्प्यावर धावणे सुरू करा, सातत्य ठेवा व निरोगी राहा, हा कानमंत्र डॉ. काटे यांनी दिला.
‘रनर्स फाउंडेशन’ कोरेगाव यांच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या. त्याचबरोबर डॉ. महेश काटकर, डॉ. अजित इनामदार यांनी उपस्थितांना फिटनेस, धावणे, सायकलिंगबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी देवकर, दिलीप विलियावेटटील, प्रशांत काजळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे विद्या खराडे यांनी प्रास्ताविक केले. सागर भुंजे यांनी आभार मानले.