‘व्हॉलीबॉल व इतर खेळांसाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणार्या राष्ट्रीय खेळाडू जावेद बाशुमियाँ मनोरे यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळावा,’ असे मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. बंडा गोडसे यांनी व्यक्त केले.
वडूज : ‘व्हॉलीबॉल व इतर खेळांसाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणार्या राष्ट्रीय खेळाडू जावेद बाशुमियाँ मनोरे यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळावा,’ असे मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. बंडा गोडसे यांनी व्यक्त केले.
दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाल्याबद्दल मनोरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती विजय काळे, केंब्रीज शिक्षण संस्थेचे चेअरमन लेक्स पायमपल्लील, ज्येष्ठ नेते विश्वासराव काळे, जिल्हा बँकेचे विकास अधिकारी जयवंत गोडसे, सोसायटीचे अध्यक्ष एम. एस. गोडसे, राजेंद्र घार्गे, एम. आर. गोडसे, प्रमोद गोडसे, दशरथ गोडसे, नरेंद्र गोडसे, संजय इंगळे, संदीप खाडे, सोमनाथ साठे आदी उपस्थित होते.
प्रा. गोडसे म्हणाले, ‘मनोरे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चांगले क्रीडा नैपुण्य जपले आहे. त्यांच्या निवडीमुळे वडूज शहराचा क्रीडा क्षेत्रातील नावलौकिक वाढला आहे.’
मनोरे म्हणाले, वडूज शहरातील मित्र परिवार व नागरिकांनी दिलेल्या प्रेमामुळे आपण आयुष्यात अनेक पुरस्कार प्राप्त करू शकलो.’
यावेळी प्रा. स्वप्नील पाटील, दशरथ गोडसे, शशिकांत देशमुख, खाडे, बागल आदींची मनोगते झाली.
या कार्यक्रमास सोसायटीचे संचालक धनंजय राऊत, धीरज पाटील, उमेश देशपांडे, संतोष इंगळे, अमिन मुल्ला, बाळासाहेब गोडसे, शरद कदम, इक्बाल शेख, सज्जाद शेख, मोमीन, खान आदींसह शहरातील क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र पवार यांनी आभार मानले.