सह्याद्री हॉस्पिटलतर्फे कराडमध्ये पोलिसांची आरोग्य तपासणी
Published:Dec 07, 2021 05:52 AM | Updated:Dec 07, 2021 05:52 AM
News By : कराड | संदीप चेणगे
कराड : कराडमधील शहर पोलीस स्टेशन येथे मंगळवार आरोग्य तपासणी शिबिराला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. शहर पोलीस स्टेशन येथील शासनाचे सर्व पोलीस कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये 150 हुन अधिक रुग्णांनी लाभ घेतला. सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडच्या 12 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून हे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सहभागी झालेल्या व्यक्तींच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये वजन, ब्लड प्रेशर, रक्तातील साखरेची पातळी,इ.सी.जी. इत्यादींचा समावेश होता. या शिबिरामध्ये सह्याद्रि हॉस्पिटल कराड चे तज्ञ फिजिशियन डॉ.महेश देशमुख यांचेकडून तपासणी करण्यात आली व वैद्यकीय सल्ला देण्यात आला. यावेळी कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सह्याद्रि हॉस्पिटल कराडचे संचालक अमित चव्हाण इत्यादी उपस्थित होते. याविषयी बोलताना सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,कराडचे व्यवस्थापक डॉ.व्यंकटेश मुळे म्हणाले की, कराड येथील नागरिक आणि प्रशासन यांचा आमच्यावरचा असलेला विश्वास, दृढ होत गेलेले नाते तसेच आमच्या युनिटमधील सर्व डॉक्टर्स,नर्सेस व कर्मचार्यांचे समर्पित प्रयत्न यामुळेच आमची 12 वर्षांची वाटचाल यशस्वी ठरली आहे. याच विश्वासामुळे नागरिकांसाठी जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सोयी सुविधा आणण्याकरिता आणि अविरत रूग्णसेवेसाठी बळ मिळते,यापुढेही आमचे प्रयत्न असेच सुरु राहतील. शहर पोलीस स्टेशन येथे आरोग्यशिबिर आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही प्रशासनाचे आभारी आहोत.