कराड - पाचवड फाटा येथे गॅरेज व्यावसायिकाचा खून
Published:Feb 20, 2021 06:51 AM | Updated:Feb 20, 2021 06:51 AM
News By : Muktagiri Web Team
कराड ः गॅरेज व्यावसायिकांत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकास लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे-बंगळूर महामार्गानजीक पाचवड फाटा ता. कराड येथे शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. रवी यादव (वय 24 रा. उत्तर प्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बंगळूर महामार्गानजीक पाचवड फाटा ता. कराड येथे गॅरेज व्यावसायिक राम प्रसाद व रवी यादव (दोघे रा. उत्तर प्रदेश) यांच्या शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास पाण्याची मोटर चालू बंद करण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी रवी यादव याला लाकडी दांडक्याने मारहाण झाली. गंभीर मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.