कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मिळून एक लढा उभारू

रेश्माताई भोसले : फलटणमधील होळ व वाडी-वस्तीवर मोहिमेचा प्रारंभ
Published:Sep 19, 2020 02:46 PM | Updated:Sep 19, 2020 02:46 PM
News By : Muktagiri Web Team
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मिळून एक लढा उभारू

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील आपल्या गावात, वाडी-वस्तीवर आलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांना आपल्या कुटुंबातील लोकांची माहिती द्या. घरातील कोणत्याही व्यक्तीला थंडी, ताप, खोकला व तत्सम आजाराची लक्षणे दिसून येत असतील तर त्याची कल्पना देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मिळून एक लढा उभारू,’ असे प्रतिपादन फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या रेश्माताई भोसले यांनी केले.