वडजल, ता. फलटण येथे सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 1 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सातारा : वडजल, ता. फलटण येथे सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 1 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत माहिती अशी दि.17 रोजी वडजल गावच्या हद्दीत शेतातील पत्र्याचे शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने त्याठिकाणी जावून छापा टाकला. तेथे संभाजी साहेबराव चोरमले वय 45, रा. बुधवार पेठ फलटण, गजानन महादेव डोंबाळे वय 35, रा. बुधवार पेठ फलटण, संदीप जगन्नाथ कांबळे वय 54, रा. निंभोरे, ता. फलटण, डबलूसिंग विवेकानंद सिंग वय 36 वर्षे, रा. निंभोरे ता. फलटण, मुळ रा. वारसलीगंज (बिहार), समीर चंदूभाई मारोट वय 46 वर्षे, रा. निंभोरे ता. फलटण मुळ रा. गांधीनगर गुजरात, ज्ञानेश्वर रामदास जगताप वय 47 वर्षे रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी पुणे, शरद बाळू खवळे वय 30 वर्षे, रा.निंभोरे ता. फलटण जि.सातारा हे सर्वजण तीनपत्ती जुगार खेळत असताना मिळून आले. त्यांच्या कब्जातून रोख रक्कम, जुगार साहित्य, मोबाईल हॅन्डसेट, 1 मोटार सायकल असा एकूण 1 लाख 67 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भादविक 188, 269, 200, म.जु.अ.क .12 (अ), आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 51 (ब), साथीचे रोग अधिनियम कलम 2, महाराष्ट्र कोविड 19 विनियमन 2020 चे कलम 11 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पो. हवा. अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पो. ना. शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, विशाल पवार, सचिन ससाणे, चा. पो. कॉ. विजय सावंत, पो. ना. अर्जुन शिरतोडे आणि राजू ननावरे यांनी केली.