कराड ः पालिकेच्या बाराडबरी परिसरातील कचरा डेपोला आग लागली आहे. आगीमुळे सुमारे पाचशे मीटर परिसरातील कचरा जळाल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले आहेत. वार्यामुळे धुर नागरी वस्तीमध्ये जात असल्याने येथील वातावरण दुषित झाले आहे. येथील नागरिक दारे खिडक्या बंद करून तोंडाला रुमाल व मास्क घालून घरात बसले आहेत. पालिकेच्यावतीने युध्दपातळीवर आग व धुरू आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बुधवारी रात्री अज्ञातांनी येथील कचरा डेपोला आग लावली आहे. धुर परिसरात पसरू लागल्याने आगीबाबत नागरिकांनी पालिकेला माहिती दिली. पालिकेच्या कर्मचार्यांनी रात्रीपासून आग व धुरू आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अग्शिनशामन बंबाच्या गाड्या व जेसीबीच्या सहाय्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र कचर्याचे मोठे ढिग असल्याने व आग खोल्यावर पसरल्याने मोठ्याप्रमाणात धुरू झाला आहे. धुराचे लोट परिसरात पसरत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.