फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथे बी.एस्सी हॉर्टिकल्चर चौथ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषीकन्या प्रियांका महेंद्र कोंडके व पल्लवी राजेंद्र शिंदे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाअतंर्गत सस्तेवाडी येथे वृक्षारोपण करून वृक्षारोपणाचे महत्त्व ग्रामस्थ महिलांना पटवून दिले.
फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथे बी.एस्सी हॉर्टिकल्चर चौथ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषीकन्या प्रियांका महेंद्र कोंडके व पल्लवी राजेंद्र शिंदे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाअतंर्गत सस्तेवाडी येथे वृक्षारोपण करून वृक्षारोपणाचे महत्त्व ग्रामस्थ महिलांना पटवून दिले.
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सस्तेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील जागेत फिकस, दुरंडा, मोरपंखी व इतर फुलांच्या झाडांचे वृक्षारोपण करून ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व संगोपन आवश्यक असल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले.
या कार्यक्रमास सरपंच राधिका कदम, उपसरपंच विनायक चव्हाण, ग्रामसेवक मोहन सुतार, ग्रामपंचायत सदस्य व शिपाई बाळासाहेब सस्ते, धनंजय चव्हाण, रेखा चोरमले यांच्यासह सस्तेवाडी येथील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.