सप्टेंबरअखेर शहर व तालुक्यात बाधितांची संख्या 4 हजारपेक्षा अधिक होण्याची शक्यता

मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांची माहिती; ‘आयएएचव्ही’ संस्थेकडून पालिकेकडे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशिन्स सुपूर्द
Published:Sep 15, 2020 02:30 PM | Updated:Sep 15, 2020 02:30 PM
News By : Muktagiri Web Team
सप्टेंबरअखेर शहर व तालुक्यात बाधितांची संख्या 4 हजारपेक्षा अधिक होण्याची शक्यता

‘फलटण शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या सुमारे 2 हजारपर्यंत पोहोचली असून, त्यापैकी 700 रुग्ण फलटण शहरात आहेत. आतापर्यंत 30 ते 40 दिवसांनी दुप्पट होणारी रुग्णसंख्या आता 15 दिवसांत दुप्पट होत असून, त्यामध्ये वृद्धांची संख्या अधिक आहे. सप्टेंबरअखेर शहर व तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 4 हजारपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.