मराठा समाजाला दिलेले आरक्षण राज्य सरकारने कायम ठेवून त्याचा अध्यादेश काढावा.तसेच सुप्रीम कोर्टात पुनर्याचिका दाखल करण्यात यावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चा फलटणच्यावतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
फलटण : मराठा समाजाला दिलेले आरक्षण राज्य सरकारने कायम ठेवून त्याचा अध्यादेश काढावा.तसेच सुप्रीम कोर्टात पुनर्याचिका दाखल करण्यात यावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चा फलटणच्यावतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, सर्व स्थानिक आमदार, खासदार, मंत्री यांना भेटून याबाबत आपण विधानपरिषद, विधानसभा व लोकसभेत मराठा समाजाचे आरक्षण कायम करावे, याबाबत भेटून निवेदन देण्यात आले.
तसेच आज विधानपरिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, ना. शंभूराज देसाई, खा. उदयनराजे भोसले, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. दीपक चव्हाण यांना प्रत्यक्ष तथा पोस्टाने या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत.
गत सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्याने राज्य सरकारवरती मराठा समाज खूप नाराज झाला असून, आमचा अंत पाहू नका, जगाला 58 मोर्चे काढून शांततेत काढले आहेत. आता मूक मोर्चा काढणार नाही तर ठोक मोर्चास प्रवृत्त करू नका, असे ठणकाहून सांगितले आहे. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने योग्य ती बाजू न मांडल्याने आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे, असा आरोप करून महाराष्ट्र सरकारने मिळालेल्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला घेता यावा यासाठी राज्य शासनाने अध्यादेश काढून शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण द्यावे. तसेच सुप्रीम कोर्टात पुनर्याचिका दाखल करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.