अखेर मिळाला मांडवे गावास गावकारभारी
News By : Muktagiri Web Team
मांडवे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सागर चंदनशिवे यांची बिनविरोध निवड झाल्याने अखेर गावास गावकारभारी मिळाला.
वडूज : मांडवे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सागर चंदनशिवे यांची बिनविरोध निवड झाल्याने अखेर गावास गावकारभारी मिळाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मांडवे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सदाशिव रामचंद्र खाडे व पोपटराव शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जय हनुमान ग्रामविकास पॅनेलची स्थापना केली. या पॅनेलने नऊपैकी पाच जागा जिंकून सत्ता अबाधित राखली. सरपंच-उपसरपंच निवडणुकीमध्ये सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला या जागेसाठी राखीव असल्याकारणाने तांत्रिक बदलासाठी सरपंचपदाची निवडणूक राखीव ठेवली होती.
सदाशिव खाडे, सागर चंदनशिवे, पोपटराव पाटील, रुक्मिणी फडतरे, माधुरी देशमुख, विजय खाडे, उज्ज्वला खाडे, सुनीता खाडे, संगीता खाडे आदी उमेदवार या निवडणुकीत निवडून आले होते. मांडवे गावची ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली.
सरपंच निवडणुकीमध्ये सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला या जागेसाठी राखीव होते. परंतु, या जागेसाठी उमेदवार नसल्याने ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार व जिल्हाधिकारी सातारा यांच्या अदेशादुनसार तांत्रिक अडचण दूर करून दि. 20 एप्रिल 2021 रोजी सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेत महिला उमेदवार नसल्याने त्याच प्रवर्गातील पुरुष उमेदवारास संधी देण्यात आली. यामध्ये प्रा. सागर बापूराव चंदनशिवे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर विजय खाडे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.
ग्रापंचायतीचे नूतन सरपंच व उपसरपंच हे दोन्ही सुशिक्षित असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्याप्रकारे पार पडेल, अशी सर्व ग्रामस्थांनी आशा व्यक्त केली. माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी नूतन सरपंच व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
राजू भाई मुलाणी, अर्जुन पाटील, जोतिराम बागल, दत्तात्रय पाटील, अशोक फडतरे, सदाशिव देशमुख, पांडुरंग खाडे, सुनील खाडे, किशोर क्षीरसागर, शशिकांत देशमुख, भारतशेठ खाडे, बबन खाडे, संतोष बर्गे, भरत देशमुख, आकाराम ओंबासे, ब्रह्मदेव पाटोळे, वसंत पाटोळे, दशरथ ढोले, अप्पा ढोले, दिवेश ढोले, लक्ष्मण ढोले, राजेंद्र देशमुख, तानाजी देशमुख, अशोक देशमुख, दादासाहेब फडतरे, आमोल यादव, पांडुरंग अवघडे, सुरेश अवघडे, जालिंदर चंदनशिवे, अशोक चंदनशिवे, सुनील चंदनशिवे, अरविंद कुंभार, आण्णा काळे, मधुकर खाडे, मारूती खाडे, दिलीप खाडे, केशव खाडे, उत्तम खाडे या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी निवडणुकीसाठी परिश्रम घेतले.