ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू
News By : Muktagiri Web Team
ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. सायमंड्सचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सच्या कारला शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये अपघात झाला. या अपघातात सायमंड्स निधन झालं आहे. डॉक्टरांनी सायमंड्सला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा अँड्र्यूला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती. अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध खेळाडू शेन वॉर्नचंही निधन झालं एजन्सीनुसार, क्वीन्सलँड पोलिसांनी सांगितलं आहे की, टाऊन्सविले शहराच्या पश्चिमेला सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये रात्री 10:30 वाजता एक अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात भरधाव वेगात असलेली कार उलटल्याचं समोर आलं आहे. अपघातावेळी अँड्र्यू सायमंड्स एकटाच गाडीत होता. एलिस नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी अँड्र्यू सायमंड्सला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण डॉक्टरांना त्यामध्ये अपयश आलं. या अपघातात सायमंडला गंभीर दुखापत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सर्व प्रयत्न करूनही अँड्र्यूला वाचवता आलं नाही. सायमंड्सच्या कुटुंबीय आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. क्रिकेट विश्वात तसेच इतर स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्यामध्ये थायलंडमध्ये सुट्टीवर असताना शेन वॉर्नचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. आता त्याच्या काही आठवड्यांनंतरच क्रीडा जगताला दुसरा मोठा धक्का बसला आहे. सायमंड्सची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट शेन वॉर्नला श्रद्धांजली देणारी होती. सायमंड्सचं करिअर शानदार होतं. त्याने 198 वनडे सामन्यांमध्ये 5088 रन बनवले. यामध्ये सहा शतकं आणि 30 अर्ध शतकांचा समावेश आहे. सायमंड्स ऑल राऊंडर क्रिकेटपटू होता. त्याने या फॉर्मेटमध्ये 133 विकेट घेतल्या. तसेच 26 टेस्ट मॅचमध्ये 1462 रन काढण्याची कामगिरी केली आहे. शिवाय 24 विकेटही घेतल्या आहेत. सायमंड्स 14 टी 20 सामने खेळले.