मांडवे (ता. खटाव) येथील उपसरपंच पदाची निवड अतिशय चुरशीने झाली. या निवडीत प्रस्थापित नेतृत्वाला शह देत गावचे युवा नेते व सातारा जि. प. चे चतुर्थश्रेणी कर्मचारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष तुकाराम खाडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने गावामध्ये ‘नवीन युवा पर्वा’चा उदय केला आहे.
निमसोड : मांडवे (ता. खटाव) येथील उपसरपंच पदाची निवड अतिशय चुरशीने झाली. या निवडीत प्रस्थापित नेतृत्वाला शह देत गावचे युवा नेते व सातारा जि. प. चे चतुर्थश्रेणी कर्मचारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष तुकाराम खाडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने गावामध्ये ‘नवीन युवा पर्वा’चा उदय केला आहे.
या निवडणुकीत सरपंचपदाचा अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील उमेदवार नसल्याने हे पद काही दिवसांसाठी रिक्त राहणार आहे. त्यामुळे उपसरपंच पदाला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. मागील सत्ताधारी जय हनुमान पॅनेलच्या वतीने पोपट खाडे-पाटील निवडणूक रिंगणात होते. तर त्यांच्या विरोधात प्रा. विजय नारायण खाडे या सुशिक्षित युवकास उमेदवारी देऊन तुकाराम खाडे यांनी परिवर्तनाची साद घातली.
निवडणुकीत प्रा. खाडे यांना संगीता नामदेव खाडे, उज्ज्वला विक्रम खाडे, सुनीता धनाजी खाडे या तीन सदस्यांनी सहकार्य केले. विरोधी उमेदवार पाटील यांनाही चार मते मिळाली. तर एक मत बाद झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. सानप यांनी चिठ्ठीद्वारे निर्णय घेतला. यामध्ये प्रा. खाडे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.
या निवडीकामी लक्ष्मणराव खाडे, बापूराव खाडे, पै. चंद्रहार खाडे, गणपत खाडे, अॅड. रामचंद्र खाडे, विक्रम खाडे, संभाजी खाडे, दादासाहेब खाडे, राजेंद्र खाडे, भरत खाडे, दिलीप खाडे, विकास पाटोळे, देवा पाटोळे, रामभाऊ फडतरे, नामदेव खाडे, मोहन पाटोळे, जयसिंग खाडे, पै. बापूराव खाडे, डॉ. तानाजी खाडे, रमेश पाटील, तुषार खाडे, प्रसाद खाडे, पै. हणमंत खाडे, विठ्ठल पाटील, पोपट ढोले, संपत खाडे, संजय अवघडे, रवी क्षीरसागर, हर्षल सुतार, संतोष खाडे, विक्रम खाडे, राजेंद्र पालकर, संतोष सुतार, सोमनाथ कुंभार आदींनी विशेष परिश्रम घेतले.
नूतन उपसरपंच प्रा. विजय खाडे यांचा भगवानराव गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.