खटाव तालुक्यात मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार दोन वैद्यकीय व्यावसायिक, एका लहान बालकासह 45 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी केलेले 23 तर रॅपिड टेस्टचे 12 रुग्ण आहेत. बाधितांमध्ये एक पशुवैद्यकीय, एक बालरोगतज्ज्ञ, तसेच एक वर्षाच्या लहान बालकाचा समावेश आहे.
वडूज : खटाव तालुक्यात मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार दोन वैद्यकीय व्यावसायिक, एका लहान बालकासह 45 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी केलेले 23 तर रॅपिड टेस्टचे 12 रुग्ण आहेत. बाधितांमध्ये एक पशुवैद्यकीय, एक बालरोगतज्ज्ञ, तसेच एक वर्षाच्या लहान बालकाचा समावेश आहे.
सोमवारी एकूण 67 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामध्ये मायणी 4, उंचीठाणे 3, रेवली 7, राजाचे कुर्ले 3, कलेढोण 1, कातरखटाव 13, वडूज 11, चितळी 4, पुसेगाव 10, पुसेसावळी 1, विसापूर 1, खातगुण 7, डिस्कळ 1, वेटणे 1 येथील रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये वडूज शहरातील दोन वैद्यकीय व्यावसायिकांचाही समावेश आहे.
वाकेश्वरची साखळी वाढली
वाकेश्वर येथे दोन दिवसांपूर्वी एक 65 वर्षीय नागरिक बाधित झाले होते. त्यांच्या घरातील 49 वर्षाचा भाऊ, 45 वर्षीय भावजयी तसेच 33, 34 वर्षीय मुले, 25 वर्षीय सून, 16 वर्षाचा पुतण्या, 20 वर्षाची पुतणी तसेच 1 वर्षाचा नातू बाधित सापडले आहेत.
‘तो मी नव्हेच’चा खुलासा
वडूज येथील एक पशुवैद्यकीय व्यावसायिक बाधित झाल्याचे वृत्त मंगळवारी सायंकाळी समाज माध्यमातून फिरत होते. सदरचे पशुवैद्यकीय अधिकारी वडूज येथील रहिवासी आहेत. त्यांनीही वडूज येथील लघुसर्व पशुचिकित्सालयाचा चार्जही घेतला आहे. मात्र, सातारा येथील पॉलीक्लिनिकमधून त्यांना अजून सोडण्यात आले नाही. त्यामुळे त्या ठिकाणीच ते कार्यरत आहेत. तर मागील आठवड्यात एका जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर बाधित झाले होते. या दोन्ही संदर्भात वडूज येथे कार्यरत असणार्या डॉ. नितीन खाडे यांना वरचेवर फोन, मेसेज येत आहेत. मात्र, त्यांना प्रत्येकास ‘तो मी नव्हेच’ असा खुलासा करावा लागत आहे.