रहिमतपूर आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर असून सुद्धा आरोग्य सुविधांची वानवा पाहायला मिळत आहे. कारण, आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळेस डॉक्टर उपलब्ध नसल्याने या आरोग्य केंद्राची जबाबदारी परिचारिका आणि कंपाउंडरवर पडत येत आहे. तसेच रात्री-अपरात्री जर एखादा पेशंट आरोग्य केंद्रात आला तर त्याची डॉक्टराविना गैरसोय होत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभाराला रुग्ण वैतागले असून, 24 तास रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टर उपलब्ध असावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
रहिमतपूर : रहिमतपूर आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर असून सुद्धा आरोग्य सुविधांची वानवा पाहायला मिळत आहे. कारण, आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळेस डॉक्टर उपलब्ध नसल्याने या आरोग्य केंद्राची जबाबदारी परिचारिका आणि कंपाउंडरवर पडत येत आहे. तसेच रात्री-अपरात्री जर एखादा पेशंट आरोग्य केंद्रात आला तर त्याची डॉक्टराविना गैरसोय होत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभाराला रुग्ण वैतागले असून, 24 तास रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टर उपलब्ध असावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
रहिमतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रहिमतपूरसह पंचक्रोशीतील रुग्ण उपचाराला येतात. मात्र, या केंद्राची अवस्था दोन डॉक्टर असून सुद्धा नर्सच्या भरोशावर कारभार सुरू आहे. तसेच डॉक्टरांना राहण्यासाठी कॉटेजची व्यवस्था असतानाही डॉक्टर तिथे राहत नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळेस येणार्या रुग्णांचे उपचार नर्सेस करत असून, फोनवरून रुग्णाची माहिती डॉक्टरांना दिली जाते व डॉक्टर फोनवरून काय उपचार करायचे याबद्दल नर्सेसला माहिती देतात. यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या मनात आरोग्य केंद्राबद्दल भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
याचबरोबर दवाखान्यात रात्रीच्या वेळी होणार्या प्रसूतीही येथील नर्सेस डॉक्टरांविना करतात, ही बाब धक्कादायक असून, यावेळी कोणता प्रसंग ओढवला तर याला जबाबदार कोण?, अशाप्रकारे बेजबाबदारपणे उपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे.
तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, आरोग्य सेवक, प्रशासकीय यंत्रणा दिवस-रात्र काम करीत असताना रहिमतपूर आरोग्य केंद्रात मात्र विपरित वर्तन होत असल्याचे नागरिकांचे मत आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार बंद करून आरोग्य केंद्रात 24 तास डॉक्टर उपलब्ध राहण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.