पाटण येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा

आंदोलनाचा दुसरा दिवस
Published:Oct 26, 2023 10:24 PM | Updated:Oct 26, 2023 10:24 PM
News By : पाटण I विद्या म्हासुर्णेकर
 पाटण येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा

मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लोकप्रतिनिधी, सत्ताधारी नेत्यांना गावबंदीचे फलक लागत आसताना पाटण तालुक्यातील मराठा समाज आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभागी होऊन गावागावात नेत्यांना गावबंदी करत तशा आशयाचे फलक गावाच्या प्रवेश द्वारात लावत आहे. व फलक सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.