कृष्णा बँकेकडून सभासदांना १२ टक्के लाभांश

बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; ११५० कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट
Published:Sep 25, 2023 05:56 PM | Updated:Sep 25, 2023 05:59 PM
News By : कराड | संदीप चेणगे
कृष्णा बँकेकडून सभासदांना १२ टक्के लाभांश

कृष्ण बँकेच्या वार्षिक सभेत चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला. याला सभेची मंजुरी मिळताच, सभा सुरु असतानाच व्यासपीठावरुन बँकेचे मार्गदर्शक डॉ. सुरेश भोसले यांनी लॅपटॉपवर क्लिक केले आणि अत्याधुनिक ऑनलाईन प्रणालीद्वारे क्षणार्धात सभासदांच्या बँक खात्यावर एकूण ८३ लाख रुपये लाभांश रक्कम वर्ग झाली. सभेतच बहुतांश सभासदांनी मोबाईल उंचावून दाखवित लाभांश रक्कम मिळाल्याचा एस.एम.एस. आल्याचे जाहीर केल्याने बँकेच्या या कृतीचे कौतुक सभास्थळी होत होते.