स्टेट बँकेतील अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी येणार्या ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी, अन्यथा मनसे स्टाईलने खळळ्खट्याक् दाखवून देऊ, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे. याबाबत सोमवारी मनसेच्या पदाधिकार्यांनी वडूज शाखा व्यवस्थापक यांना लेखी निवेदन दिले.
वडूज : स्टेट बँकेतील अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी येणार्या ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी, अन्यथा मनसे स्टाईलने खळळ्खट्याक् दाखवून देऊ, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे. याबाबत सोमवारी मनसेच्या पदाधिकार्यांनी वडूज शाखा व्यवस्थापक यांना लेखी निवेदन दिले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार, रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक सूरज लोहार, तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे, सतीश पवार, नीलेश जाधव, राहुल राऊत, आयाज शेख, अतुल राऊत, किशोर राऊत, सूरज पवार, प्रथमेश नवले, चित्रसेन मुके, रणजित पडमळकर, युवराज पाटील, विशाल जानकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, बँकेत येणार्या ग्राहकांशी व खातेदारांशी अधिकारी हे बेफिकिरीने बोलत असतात. ग्राहकांना हातातील चलन घेऊन अनेक टेबलावर फिरवले जाते. ग्राहक एका टेबलला आला की त्याला अनेक ठिकाणी सह्या घेण्यासाठी पाठवले जाते. वास्तविक हे काम कर्मचार्यांचे असताना ग्राहकांना व खातेदारांना विनाकारण त्रास दिला जातो. ग्राहकांना मार्गदर्शन केले जात नाही. शासकीय चलन भरण्यासाठी स्वतंत्र काउंटरची सोय नाही.
बँक सुरू होण्याच्या वेळेत ग्राहक व खातेदार आला तरीसुद्धा प्रत्यक्ष कामकाज अर्धा व तासाभराने सुरू होते. कॅशीयर अनेकवेळा काउंटर सोडून जातात. तसेच रांगेतील ग्राहक सोडून मध्येच घुसलेल्यांची कॅश भरण्यासाठी घेतात. बँकेच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात. बँक पासबुक प्रिंटिंगची मशीन नेहमी बंदच असते. कोरोनामुळे ग्राहक, खातेदार जबाबदारीने मास्कचा वापर करतात; मात्र शाखा व्यवस्थापकच मास्क वापरत नाहीत, ही बाब फारच गंभीर आहे.
ग्राहक सेवेतील त्रुटी गंभीर असून ग्राहक सरंक्षण कायदा 2019 नुसार ग्राहकांना व खातेदारांना योग्य सेवा देणे, हे कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊन तातडीने सेवेत सुधारणा करावी, अन्यथा वरिष्ठ कार्यालयात दाद मागावी लागेल व होणार्या परिणामास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल, असा इशारा ही त्यांनी दिला निवेदनाद्वारे दिला आहे.
आता हात जोडलेत नंतर, हात उचलावे लागतील...
वडूज येथील स्टेट बँकेच्या शाखेकडून नागरिकांना चांगली वागणूक मिळत नसल्याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर संबंधित बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना ‘मनसे’च्या वतीने निवेदन दिले आहे आणि हात जोडून आपल्या कारभारात सुधारणा करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या कामकाजात बदल झाला नाही तर हात कसा उचलायचा, याचा अभ्यास आम्हा पदाधिकार्यांना चांगला आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असा इशारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला.