कोरोना विषाणूचे सावट आज सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. शिवजयंती सारखा उत्सव ही त्याला अपवाद कसा ठरेल. खटाव परिसरात आज शिवजयंती उत्सव कोरोना सावटाखाली पण उत्साहात साजरा झाला.
खटाव : कोरोना विषाणूचे सावट आज सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. शिवजयंती सारखा उत्सव ही त्याला अपवाद कसा ठरेल. खटाव परिसरात आज शिवजयंती उत्सव कोरोना सावटाखाली पण उत्साहात साजरा झाला.
शिवजयंती जवळ येताच परिसरातील मावळ्यांची काही दिवसांपासून तयारीची लगबग सुरू होती. कोरोनाचे सावट असल्याने मोजक्या मावळ्यांच्या उपस्थितीत व सर्व खबरदारी बाळगून आसपासच्या किल्ल्यावरून शिवज्योत आणली गेली. खटाव येथील शिवजयंती उत्सव समितीच्या मावळ्यांनी तर चक्क सिंधुदुर्ग किल्ल्यावरून शिवज्योत आणली. सदर शिवज्योतीचे आगमन होताच गावातून ज्योतीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
सायंकाळी सहानंतर निवडक मावळ्यांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये स्वच्छता विषयी जनजागृती करण्यात आली. त्या आशयाचे दिवसभर पथनाट्य ही सादर करण्यात आले. तसेच हलगी वादन, मल्लखांब, शिवरायांच्या पुतळ्याचा पालखी सोहळा पार पडला तसेच खबरदारी घेऊन मोजक्या मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी आदी घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता.