‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वसामान्य शेतकर्यांच्या हिताचे नेहमीच प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे काम करत आहे. फलटण पंचायत समितीच्या प्रांगणात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एटीएमची सेवा दिल्याने एटीएमची सेवा ग्राहकांच्या हिताचे ठरणारी आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
आसू : ‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वसामान्य शेतकर्यांच्या हिताचे नेहमीच प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे काम करत आहे. फलटण पंचायत समितीच्या प्रांगणात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एटीएमची सेवा दिल्याने एटीएमची सेवा ग्राहकांच्या हिताचे ठरणारी आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
नुकतेच फलटण पंचायत समितीच्या आवारात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएमचे उद्घाटन रामराजे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सातारा जिल्हा बँकेचे संचालक व फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर, उपसभापती रेखाताई खरात, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेश्माताई भोसले, पंचायत समिती सदस्य संजय कापसे तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फलटण विभागातील कर्मचारी, अधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
फलटण शहरात मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा बँकेच्या एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांची सोय व्हावी, या दृष्टीने हे एटीएम सुरू होत असून, त्याची सेवा ही उत्तम असल्याने त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे, असे ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.
‘पंचायत समिती या प्रशासकीय इमारतीमध्ये फलटण तालुक्यातून ग्रामीण भागातील येणार्या ग्रामस्थांची पैशाच्या व्यवहारासाठी इतर एटीएममध्ये जावे लागत होते. ही गरज ओळखून जिल्हा बँकेचे एटीएम सुरू केले आहे,’ असे प्रतिपादन शिवरुपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केले.
फलटण पंचायत समितीच्या उपसभापती रेखाताई खरात यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर पंचायत समिती सदस्या रेश्माताई भोसले यांनी आभार मानले.