नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून आणि आ. महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव शहरात अवघ्या पावणेदोन वर्षात 29 कोटींची विकासकामे मार्गी लागली असून, त्यापैकी 7 कोटींची कामे सुरू झालेली आहेत. कोरेगावकरांनी मतांच्या माध्यमातून दिलेला भरभरून प्रतिसाद लक्षात घेऊन कोरेगावात आ. महेश शिंदे यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. केवळ पोकळ घोषणाबाजी नाही, तर प्रत्यक्षात विकासकामे मंजूर करून, त्याचा शुभारंभ करणे आणि विकासकामे दर्जेदार कसे होतील, यासाठी त्यावर लक्ष
कुमठे : ‘नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून आणि आ. महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव शहरात अवघ्या पावणेदोन वर्षात 29 कोटींची विकासकामे मार्गी लागली असून, त्यापैकी 7 कोटींची कामे सुरू झालेली आहेत. कोरेगावकरांनी मतांच्या माध्यमातून दिलेला भरभरून प्रतिसाद लक्षात घेऊन कोरेगावात आ. महेश शिंदे यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. केवळ पोकळ घोषणाबाजी नाही, तर प्रत्यक्षात विकासकामे मंजूर करून, त्याचा शुभारंभ करणे आणि विकासकामे दर्जेदार कसे होतील, यासाठी त्यावर लक्ष देत असल्याने शहरामध्ये समाधानाचे वातावरण आहे,’ अशी माहिती प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली.
कोरेगावकरांनी मोठ्या विश्वासाने आ. महेश शिंदे यांना मताधिक्याने विजयी केले आहे. आजवर शहराने कोणत्याही आमदाराला भरभरून दिली नाही, एवढी साथ महेश शिंदे यांना देत मोठा इतिहास घडविला आहे. कोरेगावकरांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता, त्यांनी बोलणे कमी आणि काम जास्त या नेहमीच्या कार्यक्षैली प्रमाणे शहरासाठी भरीव निधी आणला आहे. नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून त्यांनी शहरांतर्गत अनेक वर्षे रखडलेली रस्त्याची कामे मार्गी लावली आहेत. केवळ विकासकामांचा शुभांरभ करुन ते थांबले नाहीत, तर त्यांनी विकासकामांची पाहणी करत, नागरिकांना काही अडचणी नाहीत ना, याची विचारणा केली आहे. कोणत्याही परिस्थितीत दर्जेदार काम झाले पाहिजे, याकडे त्यांचा कटाक्ष आहे, असेही राजाभाऊ बर्गे यांनी स्पष्ट केले.
आ. शशिकांत शिंदे यांनी आजवर कोरेगाव शहरात राजकारण करण्यापलीकडे काहीच ठोस केले नाही. दोनवेळा आमदार होऊन देखील, त्यांनी कोरेगाव शहरावर कधीच प्रेम केले नाही. त्यांनी केवळ आणि केवळ राजकारण केलेच आहे. विकासकामे करण्यापेक्षा आपली मनमानी ठेवल्याने त्यांना विधानसभा निवडणुकीत कोरेगावातून धोबीपछाड देण्यात सर्वसामान्य जनता यशस्वी ठरली आहे. स्वत: कोणतेही विकासाचे काम करायचे नाही, दुसरा करत असल्यास त्याला विरोध करायचा, त्याचे काम हाणून पाडायचे आणि स्वत:चा मोठेपणा मिरवायचे, हे धोरण राबविल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कोरेगावकर जनता हुशार आणि अभ्यासू असून, हिशेब करण्यात वाकबगार असल्याचे बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले.
शहराचे हृदय असलेल्या प्रभाग क्र. 7 व 8 मध्ये आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. प्रभागातील प्रत्येक नागरिकाचे मत जाणून घेऊन, त्याप्रमाणे विकासकामांची आखणी करण्यात आलेली आहे. गेली अनेक वर्षे न झालेली विकासकामे आम्ही हातात घेतली आहेत. आम्ही घोषणाबाजी न करता, कामे मंजूर करून आणतो, त्याचे काम सुरू करतो आणि काम सुरू असताना त्याच्यावर देखरेख ठेवतो, कारण जनतेला अपेक्षित अशी दर्जेदार व टिकावू विकासकाम देण्याचा आमचा मानस आहे, आमदार महेश शिंदे यांनी देखील या विकासकामांची पाहणी करुन, आवश्यक तेथे बदल करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिलेल्या आहेत, असे बर्गे यांनी सांगितले.
भिलारे कॉर्नर-रामलिंग रोड-बुरुडगल्ली-व्यापार पेठ- चौथाई परिसर भुयारी गटारे आणि रस्ते ट्रिमिक्स काँक्रिटीकरण (3 कोटी 5 लाख रुपये), आर. एम. देसाई पेट्रोल पंप ते कन्याशाळा रस्ता ट्रिमिक्स काँक्रिटीकरण (30 5 लाख रुपये), शांतीनगरमध्ये (सागर दोशी घर ते रहिमतपूर रस्ता आणि श्रीकांत बर्गे घर ते रहिमतपूर रस्ता) रस्ते ट्रिमिक्स काँक्रिटीकरण (65 लाख रुपये), गोसावी वस्ती ते अरुण बर्गे यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रिटीकरण (40 लाख रुपये), भगवा चौक ते अयोध्या कॉलनी रस्ता ट्रिमिक्स काँक्रिटीकरण (40 लाख रुपये), लक्ष्मीनगर येथील गोसावी हॉस्पिटलसमोर रस्ता ट्रिमिक्स काँक्रिटीकरण (2 कोटी 20 लाख रुपये), आदी कामांसाठी एकूण 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
कोरोना काळातही विकासकामे मंजूर करणारे आमदार उर्वरित 22 कोटी रुपयांची कामे मंजूर झालेली असून, त्याचा शुभारंभ नजीकच्या काळात केला जाणार आहे. कोरोना काळात जनतेसाठी अहोरात्र झटणारे आ. महेश शिंदे यांनी रुग्ण आणि नातेवाइकांना जसा दिलासा दिला आहे, तसाच विकासकामे आणून इतर नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत, अशी माहितीही प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली.