‘सातेवाडी (ता. खटाव) येथील मधुमाला सांस्कृतिक केंद्रात सुरू करण्यात आलेल्या हुतात्मा स्मृती आयसोलेशन कक्षामुळे प्राथमिक अवस्थेतील रुग्णांना चांगला दिलासा मिळेल,’ असे मत गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी व्यक्त केले.
वडूज : ‘सातेवाडी (ता. खटाव) येथील मधुमाला सांस्कृतिक केंद्रात सुरू करण्यात आलेल्या हुतात्मा स्मृती आयसोलेशन कक्षामुळे प्राथमिक अवस्थेतील रुग्णांना चांगला दिलासा मिळेल,’ असे मत गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी व्यक्त केले.
माजी सभापती संदीपदादा मांडवे मित्र मंडळ, वडूज येथील जनता गॅरेज कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या या कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, नगराध्यक्ष सुनील गोडसे, माजी सरपंच हणमंतराव कोळेकर, डॉ. संतोष मोरे, आनंद पवार, महेश इगावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
काळे म्हणाले, ‘काही रुग्णांच्या केवळ टेस्ट पॉझिटिव्ह येत असतात, मात्र त्यांना आजाराची लक्षणे नसतात. अशा काही रुग्णाना स्वत:च्या घरी विलगीकरणाची सुविधा नसेल त्यांच्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.’
संदीप मांडवे यांनी सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्यासाठी हे केंद्र सुरू केल्याचे सांगितले. याठिकाणी युवकांचे मोठे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी नगराध्यक्ष गोडसे, धनंजय क्षीरसागर, धनाजी गोडसे यांचेही मनोगत झाले.
दरम्यान, माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, विपुल गोडसे, इम्रान बागवान आदींनीही उद्घाटनानंतर भेट दिली.