जागतिक महिला दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे राबवण्यात आला. यानिमित्ताने संघटनेच्या खटाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त खटाव तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या भगिनींचा पुष्पगुच्छ, रोपे तसेच कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे सन्मानपत्र देऊन महिलांचा गौरव करण्यात आला.
भोसरे : जागतिक महिला दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे राबवण्यात आला. यानिमित्ताने संघटनेच्या खटाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त खटाव तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या भगिनींचा पुष्पगुच्छ, रोपे तसेच कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे सन्मानपत्र देऊन महिलांचा गौरव करण्यात आला.
खटाव तालुक्यातील वरची अंभेरी गावच्या किरण विष्णू शिंदे यांना व्यावसायिक महिला शेतकरी म्हणून सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. घरची जबाबदारी संभाळत किरण ताई या 2006 सालापासून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प चालवतात.
या प्रकल्पामुळे 8 ते 10 ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे तसेच त्या गेली पाच वर्षापासून कार्तिकस्वामी विद्यालय अंभेरी इथे विनामोबदला अध्यापनाचं कार्य देखील करतात, अशा त्यांच्या प्रेरणादायी कार्याला सन्मानपत्र देऊन संघटनेच्या वतीने प्रोत्साहित करण्यात आले
त्याचबरोबर सिद्धेश्वर कुरोली गावातील कोविड काळातील खर्या अर्थाने आरोग्य क्षेत्रातील कोविड योद्ध्या आशा सेविका, आरोग्य महिला सेविका राजश्री विलास देशमुख, स्वाती कृष्णात देशमुख, आएशा मुलाणी, रूपाली लावंगरे, लता कांबळे यांचा आज सक्षम महिला व कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र व पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच कृषी क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्या महिला शेतकरी नीलिमा विलास देशमुख, अंजना संजीव देशमुख, शारदा देशमुख यांना सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व छोटीशी मदत म्हणून साडी व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे खटाव तालुकाध्यक्ष नितीश देशमुख संघटनेचे सक्रिय सदस्य आशिष देशमुख, रोहित देशमुख, मयूर देशमुख, अनिकेत देशमुख, रविराज हिरवे, अक्षय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.