माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणेस ६ कोटींचा निधी मंजूर
Published:Apr 29, 2021 01:37 PM | Updated:Apr 29, 2021 01:37 PM
News By : Muktagiri Web Team
कराड: कराड दक्षिण मतदारसंघातील गावांच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून २५१५ व स्थानिक विकास निधी मधून ६ कोटींचा निधी नुकताच मंजूर झाला आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी २५१५ च्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. आ. चव्हाण यांनी २५१५ निधीसाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा पाठपुरावा केला होता यानुसार कराड दक्षिण मधील गावांच्यासाठी ३ कोटी इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. तसेच आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकासनिधीमधून ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत असा एकूण ६ कोटी रुपयांचा भरघोस निधी कराड दक्षिणेस मंजूर झाला आहे. २५१५ (इतर ग्राम विकास कार्यक्रम) मधून मंजूर निधीतून वनवासमाची येथे अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १० लाख रु., धोंडेवाडी अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ५ लाख रु., पवारवाडी (बामणवाडी) अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., कोळेवाडी येथे अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १० लाख रु., वानरवाडी येथे सामाजिक सभागृहासाठी ७ लाख रु., गोळेश्वर येथील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १० लाख रु., नांदगाव येथील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १५ लाख रु., रेठरे बु. येथील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १५ लाख रु., रेठरे बु. येथे मुस्लिम समाजासाठी कब्रस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओढ्यावर साकव पूल बांधणे यासाठी २५ लाख रु., बोत्रेवाडी (आकाईचीवाडी) येथे अंतर्गत रस्त्यासाठी ७ लाख रु., हवेलवाडी (सवादे) येथे सामाजिक सभागृह बांधणेसाठी १० लाख रु., शेळकेवाडी (येवती) सामाजिक सभागृहासाठी ७ लाख रु., नांदलापूर येथे गोपाळवस्ती अंतर्गत बंदिस्त गटार बांधणीसाठी ५ लाख रु., काले येथे कालेवाडी मालखेड (देसाईवस्ती) रस्त्यासाठी १० लाख रु., कोडोली ते वडगाव ह. रस्ता दुरुस्तीसाठी १४ लाख रु., कोडोली येथे अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., किरपे येथील अंतर्गत रस्त्यासाठी १५ लाख रु., सवादे येथील व्यायामशाळेसाठी १५ लाख रु., धोंडेवाडी येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., कापील येथील अंतर्गत रस्त्यासाठी १५ लाख रु., नारायणवाडी येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., गोटे येथील अंतर्गत रस्त्यासाठी २५ लाख रु., ओंड येथील अंतर्गत रस्ते व गटर साठी १० लाख रु., कार्वे येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., जखीणवाडी येथील येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु. असा २५१५ चा ३ कोटी इतका निधी मंजूर झाला आहे. यासोबतच आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून ३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये शेणोली येथे अंतर्गत गटर बांधणेसाठी ८ लाख रु., गवारकरवाडी (येळगाव) येथील स्मशानभूमीच्या शेडबांधणीसाठी ८ लाख रु., गोवारे येथील अंतर्गत रस्त्यासाठी व गटर साठी १० लाख रु., सैदापूर येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., सवादे येथील स्मशानभूमीच्या शेडमधील काँक्रीटीकरण व संरक्षक भिंतीसाठी १० लाख रु., साळशिरंबे येथे अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., चचेगाव येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., वडगाव ह. येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., घारेवाडी येथील अंतर्गत रस्त्यासाठी ६ लाख रु., जिंती येथील येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., वारुंजी येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., विंग येथील रस्त्यासाठी व गटर साठी १० लाख रु., म्हासोली येथील स्मशानभूमीच्या संरक्षण भूमीसाठी व पेव्हर ब्लॉक साठी १० लाख रु., रेठरे खुर्द येथील रस्त्यासाठी १० लाख रु., गवारकरवाडी (येळगाव) येथील स्मशानभूमीच्या शेडसाठी ८ लाख रु., मालखेड येथील गटर बांधणीसाठी १० लाख रु., शिंगणवाडी येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., टाळगाव येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., कालवडे येथे सामाजिक सभागृह बांधणीसाठी १५ लाख रु., तारूख येथील सभागृह दुरुस्तीसाठी ७ लाख रु., सवादे येथे हायमास्ट दिवे बसविण्यासाठी ३ लाख रु., तुळसन येथे हायमास्ट दिवे बसविण्यासाठी ३ लाख रु., बोत्रेवाडी (आकाईचीवाडी) येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., टाळगाव (शेवाळवाडी) येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., विंग येथील अंतर्गत रस्त्यासाठी ५ लाख रु., कराड येथील उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयाची दुरुस्तीसाठी ६ लाख रु., घोणशी येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., कोळे येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., शेरे येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., नांदलापूर येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., कुसूर येथे अंतर्गत रस्ते व गटर बांधणीसाठी १० लाख रु., मलकापूर नगरपालिकेला रुग्णवाहिकेसाठी १५ लाख रु., व कराड नगरपालिकेला रुग्णवाहिकेसाठी १५ लाख रु., कराड शहर मुस्लिम समाज संचलित कोविड केअर सेंटर साठी ३ लाख रु. असा भरघोस निधी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण या आपल्या मतदारसंघासाठी मंजूर करून आणला आहे. या निधीच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जाणार आहेत.