सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडचा जिल्हा अधिकाऱ्यांकडून सन्मान

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सह्याद्रि हॉस्पिटलचा गौरव
Published:Dec 25, 2021 02:10 PM | Updated:Dec 25, 2021 02:10 PM
News By : कराड | संदीप चेणगे
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडचा जिल्हा अधिकाऱ्यांकडून सन्मान

गेली 12 वर्षे सह्याद्रि हॉस्पिटल हे कराड येथे वैद्यकीय सेवा पुरवित आहे व त्यापैकी सन 2014 पासून गेली 7 वर्षे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत वैद्यकीय सेवा पुरवित असून आजपर्यंत सुमारे 11,603 हून अधिक रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. 1370 ओपन हार्ट सर्जरी, 3,500 अँजिओप्लास्टी, 1,900 मूत्रविकार शस्त्रक्रिया, 580 मेंदू व मणके शस्त्रक्रिया, 1,000 ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया, 1000 पेशंटचे डायलिसिस, 600 कर्करोग रूग्णांचे उपचार आणि 1300 कोरोना रूग्णांचे उपचार हे या योजनेअंतर्गत झाले आहेत