बदामी रंगाच्या आयशर प्रो कंपनीचा चार चाकी टेम्पो क्र. (एमएच 50/8333) या गाडीत गोवंशीय जातीची अंदाजे एक ते दोन महिने वयाची बारा जर्सी गायची वासरे कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने डांबून ठेवलेली मिळून आली असून, तौफिक इम्तियाज कुरेशी (रा. कुरेशीनगर, फलटण) यांच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र पशु छळ अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडून सुमारे 10 लाख 24 हजारांचा मुद्देमाल फलटण शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे.
फलटण : बदामी रंगाच्या आयशर प्रो कंपनीचा चार चाकी टेम्पो क्र. (एमएच 50/8333) या गाडीत गोवंशीय जातीची अंदाजे एक ते दोन महिने वयाची बारा जर्सी गायची वासरे कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने डांबून ठेवलेली मिळून आली असून, तौफिक इम्तियाज कुरेशी (रा. कुरेशीनगर, फलटण) याच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र पशु छळ अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडून सुमारे 10 लाख 24 हजारांचा मुद्देमाल फलटण शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बुधवारी (दि. 14 एप्रिल) दुपारी 4 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास आरोपी तौफिक इम्तियाज कुरेशी (रा. कुरेशीनगर, फलटण) हा कुरेशी नगर येथे स्वतःच्या फायद्यासाठी बदामी रंगाच्या आयशर टेम्पो मध्ये 12 जर्सी गाईची वासरे डांबून जात असल्याचा आढळून आला. यावेळी त्याला पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपीला पळून जाण्यात यश आले आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव पिसे यांनी दिली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवलकर करत आहेत.