खटाव तालुक्यामध्ये वाळू उपशाने तसेच गौण खनिज उत्खननमुळे नदीपात्र व पुलाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने तहसीलदार किरण जमदाडे यांनी कारवाईचे आदेश देताच आज गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणारी तीन वाहने तहसीलदार जमदाडे यांच्या पथकाने पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
वडूज : खटाव तालुक्यामध्ये वाळू उपशाने तसेच गौण खनिज उत्खननमुळे नदीपात्र व पुलाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने तहसीलदार किरण जमदाडे यांनी कारवाईचे आदेश देताच आज गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणारी तीन वाहने तहसीलदार जमदाडे यांच्या पथकाने पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निमसोड (ता. खटाव) येथे अवैधपणे गौण खनिज उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदार जमदाडे यांना समजली. या माहितीच्या आधारे तहसीलदार यांचे पथक त्याठिकाणी रवाना झाले. या पथकातील मंडलाधिकारी भोसले, तलाठी परदेशी हे खासगी वाहनाने त्याठिकाणी पोहोचले.
दरम्यान, मिळालेल्या माहितीप्रमाणे तीन ट्रॅक्टर हे अवैधपणे गौण खनिज उत्खनन करत तर या कारवाईत तीन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने जप्त केले आहेत. ज्यामध्ये देवराज नाथाजी मोरे, आनंदा शिवाजी मोरे, सतीश महादेव मोरे हे आज सकाळी 10:15च्या सुमारास निमसोड गावच्या हद्दीत अवैधपणे दगड वाहतूक करीत होते. याबाबत त्यांच्याकडे परवाना आहे का, अशी विचारणा महसूल विभागाच्या पथकाने केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले.
तर ही वाहने देवराज नाथाची मोरे, आनंदा शिवाजी मोरे, महादेव रामचंद्र मोरे यांच्या मालकीची आहेत. तद्नंतर सदरचे तीन ही ट्रॅक्टर महसूल विभागाने ताब्यात घेतले आहेत. तर प्रत्येकी वाहनांमध्ये 1 ब्रास दगड या पथकाला मिळून आला आहे. आज झालेली कारवाईची माहिती तालुक्यात समजताच वाळू माफिया तसेच अवैध गौण खनिज उत्खनन करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
अवैध गौण खनिज उत्खनन करणार्यांना सोडणार नाही..
खटाव तालुक्यातील येरळा नदी पात्रात चोरून अवैधपणे वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही भरारी पथकाची स्थापना करून हे पथक सतर्क केले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी हे भरारी पथक गस्त घालत आहे. त्यामुळे इथून पुढे तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन वाहतूक करणार्यांना सोडणार नाही.
- किरण जमदाडे, तहसीलदार, खटाव (वडूज)