पवारवाडी, ता. फलटण या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, प्रशासनाकडून पवारवाडीमध्ये योग्य ती दखल घेऊन मास्क न लावणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असताना पवारवाडीतील मास्क न वापरणार्या नागरिकांवर दंडुकांची कारवाई केली जात आहे.
फलटण : पवारवाडी, ता. फलटण या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, प्रशासनाकडून पवारवाडीमध्ये योग्य ती दखल घेऊन मास्क न लावणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असताना पवारवाडीतील मास्क न वापरणार्या नागरिकांवर दंडुकांची कारवाई केली जात आहे.
आसू-फलटण रोडलगत असणार्या पवारवाडी बस स्टॅन्ड परिसरामध्ये रस्त्यावर होमगार्डनी येणार्या जाणार्या नागरिकांवर मास्क न लावल्याच्या कारणाने दंडात्मक कारवाई करण्याऐवजी दाडक्यांनी मार देऊन कारवाई केल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेश असतानादेखील दंडात्मक कारवाई न करता जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत नागरिकांना तसेच शेतकरी वर्गाला दाडक्यांनी मारहाण करून त्यांना दांडक्यांचा महाप्रसाद दिला जात आहे. नागरिक तसेच शेतकरी वर्ग या मारहाणीमुळे त्रस्त झाला आहे.
खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियम न पाळणार्या लोकांना मारहाण न करता दंड आकारण्याचा आदेश दिला आहे, तरीही शेतातून घरी येताना तोंडाला मास्क न लावल्याच्या कारणाने याठिकाणी नेमण्यात आलेले होमगार्ड नागरिकांना मारहाण करत असून, दंड घेण्याऐवजी होणार्या मारहाणीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काहींनी या मारहाणीस विरोध केला असता उद्धटपणे कायद्याची भीती दाखवून पिटाळून लावले जात आहे.
नागरिकांकडून दंड न घेता मारहाण करण्याचा प्रकार चुकीचा असून, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख तसेच स्थानिक प्रशासनाने दंड न घेता मारहाण करणार्या होमगार्ड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.