सातारा, जावली तालुक्यातील विकासकामांसाठी 2 कोटी 15 लक्ष
खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर
Published:Dec 06, 2021 06:17 AM | Updated:Dec 06, 2021 06:17 AM
News By : कराड | संदीप चेणगे
कराड : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा व जावली तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 2 कोटी 14 लक्ष 76 हजाराचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजना तसेच ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ अशा योजनेतून निधी मंजूर झाला आहे. मंजूर कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सातारा तालुक्यातील रा.म.मा.4 ते काशीळ, कोपर्डे, नलवडेवाडी रस्ता इजिमा 64 साक्रं 5/00 ते 6/00 सुधारणा करणे 19.34 लक्ष रुपये, रामा 141 ते सातारा रेल्वेस्टेशन, महागांव, चिंचणेर (नि) वंदन ते निगडी रस्ता इजिमा 65 साक्रं 8/00 ते 9/600 सुधारणा करणे 19.34 लक्ष, रा.म.मा.4 ते लिंब, गोवे, वनगळ, आरफळ ते रा.मा. 117 पर्यंत रस्ता इजिमा 62 साक्रं 0/00 ते 6/00 सुधारणा करणे 19.34 लक्ष, शिवथर, गोवे, निकमवाडी प्रजिमा 22 रस्ता इजिमा-48 साक्रं 7/00 ते 10/00 सुधारणा करणे 19.34 लक्ष, रा.मा. 141 कोडोली एमआयडीसी ते जानाई-मळाई पायथा रस्ता इजिमा 49 साक्रं 3/00 ते 5/00 सुधारणा करणे 19.31 लक्ष, डोळेगांव, पाडळी ते इजिमा 66 (सोनापूर) रस्ता ग्रामा 225 सा.क्रं. 0/00 ते 3/00 सुधारणा करणे 14.75 लक्ष, भाटमरळी ते प्रजिमा 31 रस्ता ग्रामा 176 साक्रं 0/00 ते 2/00 सुधारणा करणे 16 लक्ष, म्हसवे येथे बंदिस्त गटर बांधणे 3 लक्ष, आरळे येथे स्मशानभूमिकडे जाणारा रस्ता करणे 3 लक्ष, अंगापूर तार्फ तारगांव येथे स्मशानभूमिकडे जाणारा रस्ता करणे 3 लक्ष, आरे तर्फ परळी येथे स्मशानभूमी शेड बांधणे 4 लक्ष, कण्हेर अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 4 लक्ष, उपळी स्मशानभूमि ते देवळापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 4 लक्ष, लिंब अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लक्ष, क्षेत्रमाहुली येथे बिलबेश्वर मंदीराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 4 लक्ष, मौजे लिंब कोटेश्वर मंदीर परिसर सुशोभीकरण करणे व वाहन तळ उभारणे 5 लक्ष, काशीळ येथे शाळा खोल्या बांधणे 8.96 लक्ष, मांडवे येथे शाळा खोल्या बांधणे 8.96 लक्ष, नागेवाडी येथे शाळा खोल्या बांधणे 8.96 लक्ष, सोनगाव (सं.) निंब येथे शाळा खोल्या बांधणे 8.96 लक्ष, गोवे शाळा दुरुस्ती 2.5 लक्ष, जावली तालुक्यातील पवारवाडी येथे समशानभूमिकडे जाणारा रस्ता करणे 3 लक्ष, सनपाने येथे स्मशानभूमिकडे जाणारा रस्ता करणे 4 लक्ष, सोनगांव येथे अंतर्गत गटर्स बांधणे 4 लक्ष, काटवली गावांतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे 3 लक्ष रुपये असा भरीव निधी मंजूर झाला आहे.