खोडशीनजीक भीषण अपघातात तीन ठार
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक
Published:Feb 23, 2021 03:35 PM | Updated:Feb 23, 2021 03:35 PM
News By : Muktagiri Web Team
कराड ः पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोडशी गावच्या हद्दीत दुचाकीला अज्ञात चारचाकीची जोरात धडक बसली. यामध्ये तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवाला सातारच्या दिशेने निघाला होता. दुचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. धडक इतकी भिषण होती की चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार झाले. अपघातस्थळावरून चारचाकी वाहनाने पलायन केले. अपघात झाल्यावर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या