‘आई-वडील मुलांना चांगले संस्कार आणि शिक्षण देत असतात. शिक्षणामुळे जीवनात गती प्राप्त होते. प्रतिकूल परिस्थितीत मुलांना चांगले शिक्षण देऊन सुसंस्कारित केलेल्या आईच्या स्मृती जपण्याचे मुलाणी कुटुंबाचे काम नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल,’ असे प्रतिपादन औंधचे सपोनि उत्तमराव भापकर यांनी केले.
औंध : ‘आई-वडील मुलांना चांगले संस्कार आणि शिक्षण देत असतात. शिक्षणामुळे जीवनात गती प्राप्त होते. प्रतिकूल परिस्थितीत मुलांना चांगले शिक्षण देऊन सुसंस्कारित केलेल्या आईच्या स्मृती जपण्याचे मुलाणी कुटुंबाचे काम नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल,’ असे प्रतिपादन औंधचे सपोनि उत्तमराव भापकर यांनी केले.
वडी (ता. खटाव) येथे. स्व. मातोश्री इंताजबी हसीम मुलाणी कायम बक्षीस ठेव योजनेतून वडी हायस्कूल वडी येथील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करताना ते बोलत होते.
यावेळी हिंदकेसरी संतोषआबा वेताळ, पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे उद्योजक दत्तात्रय देसाई, सुरेशबापू पाटील, सरपंच वैशाली मोहिते, उपसरपंच वैशाली यादव, माजी सरपंच अनिल सूर्यवंशी, पत्रकार रशिद शेख, सचिव सचिन सूर्यवंशी मुख्याध्यापक विकास अडसूळ, श्रीकांत भंडारे, फिरोज मुलाणी, किसन येवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
भापकर म्हणाले, ‘ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी आज उच्चपदावर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अंगातील गुणवत्तेला वाव देऊन आई-वडील व शाळेचे नाव उज्ज्वल करावे.’
संतोष वेताळ म्हणाले, ‘शिक्षक हे विद्यार्थी घडवण्याचे अनमोल काम करीत असतात. शिक्षकांच्या त्यागामुळे खाशाबा जाधव ऑलिम्पिकला गेले आणि त्यांनी देशाला पदक मिळवून दिले. मुलाणी कुटुंबाने राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे.’
संतोष साळुंखे यांनी पंचायत समितीच्या शेष फंडातून प्राथमिक शाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
यावेळी सानिका यादव, ऋतुजा ढोले, श्रावणी जाधव यांचा रोख बक्षीस आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी सरपंच सुदर्शन मिठारे, बाबालाल मुलाणी, प्रकाश मोहिते, सिकंदर मुलाणी ज्ञानदेव येवले, रवींद्र येवले गुरुजी, सोनू जाधव, पप्पू सूर्यवंशी, शुभम मोहिते, भिकूनाना येवले, अरुण मोहिते, शोकत मुलाणी, जहांगीर मुलाणी, राजू मुलाणी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याध्यापक विकास अडसूळ यांनी प्रास्ताविक केले. बशीर बागवान यांनी सूत्रसंचालन केले. फिरोज मुलाणी यांनी आभार मानले.