ब्रेक फेल होऊन 300 फूट दरीत गाडी कोसळली; 40 मजूर प्रवासी जखमी
महाबळेश्वर-बुरडाणी घाटात शनिवारी सकाळी अपघात
Published:Jan 14, 2023 08:31 AM | Updated:Jan 14, 2023 08:31 AM
दरे तांब ता. महाबळेश्वर येथे काम करण्यासाठी पुणे चाकण येथून 40 प्रवासी प्रवास करत होते. रस्त्याच्या कामासाठी एकूण 40 प्रवासी होते. शनिवार दि. 14 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7:00 वाजता प्रवास चालू होता. प्रवासादरम्यान बुरडाणी घाटामध्ये गाडीचे ड्रायव्हर प्रदीप खंडू कुरदने (वय 23) हे गाडी चालवत होते. गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे ड्रायव्हरने प्रसंगावधान साधून गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी 300 फूट खोल दरीत कोसळली. याच घाटामधून तळदेव येथील स्थानिक लोक प्रवास करत असताना त्यांना ही बाब लक्षात आली त्यांनी त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव येथे माहिती दिली प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव व तापोळा यांच्या तीन रुग्णवाहिका व स्टाफ घटनास्थळी दाखल झाल्या तसेच स्थानिक लोकांच्या खाजगी वाहनातून जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव येथे घेऊन आले यामध्ये लहान मुले 11 महिला 10 पुरुष 8 या लोकांची प्रकृती स्थिर असल्याकारणाने या लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव येथे ठेवण्यात आलेले आहे तसेच ज्या लोकांचे प्रकृती जखमीची व अति जखमेची आहे अशा लोकांना प्राथमिक उपचार देऊन ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे दाखल करण्यात आलेले आहे यामध्ये एकूण 11 लोकांना रेफर करण्यात आले यामध्ये गर्भवती माता 2 आहेत.