शाहू कला मंदिरामध्ये चमकली पालिका कर्मचाऱ्यांची गुणवत्ता

वर्धापनदिनाच्या संध्येला विविध गुणदर्शनाचे रंग, स्पर्धातील विजेत्यांना बक्षीस वितरण
Published:Aug 01, 2022 03:19 PM | Updated:Aug 01, 2022 03:19 PM
News By : Muktagiri Web Team
शाहू कला मंदिरामध्ये चमकली पालिका कर्मचाऱ्यांची गुणवत्ता

सातारा : सातारा पालिकेच्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्‍या विविध गुणदर्शन कार्यक्रमास सातारकरांनी उस्‍फुर्त प्रतिसाद दिला. याच अनुषंगाने पालिका कर्मचाऱ्यांच्‍यासाठी विविध स्‍पर्धांचे देखील आयोजन करण्‍यात आले होते.