माजीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मालखेडचा प्रलंबित रस्ता अखेर पूर्ण

वाहनधारकांसह ग्रामस्थांतून समाधान व्यक्त
Published:Aug 15, 2020 02:45 PM | Updated:Aug 15, 2020 02:45 PM
News By : Muktagiri Web Team
माजीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मालखेडचा प्रलंबित रस्ता अखेर पूर्ण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे रस्त्याच्या दुरूस्तीबाबत सामाजिक कार्यकर्ते देवदास माने यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी दुरूस्तीबाबतची मागणी केली. त्यावर चव्हाण यांनी तातडीने निर्णय घेऊन रस्त्याचे कामास निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण पूर्ण झाले आहे. रस्ताचे काम उत्कृष्ठ झाले असल्याने वाहनधारकांसह ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.