नवारस्ता ते मरळी जाणारे रोडवर नाडे नवारस्ता गावचे हद्दीत सांगवड पुलाजवळ दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
नितीन बबन तिकुडवे (वय 36, रा. शिंदेवाडी, ता. पाटण), भरत रामचंद्र पाटील (वय 43), बबन धोंडिराम पडवळ (वय 70 दोघेही रा. येरफळे, ता. पाटण) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अनिकेत ज्ञानदेव पाटील (रा. शिंदेवाडी, ता. पाटण), संकेत सिताराम शिंदे (रा. तामकणे, ता. पाटण) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मयत नितीन बबन तिकुडवे याच्यावर पाटण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवारस्ता ते मरळी जाणारे रोडवर नाडे नवारस्ता गावचे हद्दीत सांगवड पुलाजवळ दुचाकीवरून नितीन तिकुडवे याने त्याचे ताब्यातील दुचाकीवर पाठीमागे अनिकेत पाटील यास बसवून नवारस्ता ते मरळी बाजूकडे हयगयीने अविचाराने निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवित जात असताना समोरून मरळी ते नवारस्ता बाजूकडे जाणारे दुचाकीवर असणारे चालक भरत पाटील, धोंडिराम पडवळ व संकेत शिंदे यांना सांगवड पुलाजवळ रॉग साईडला जावून जोराची धडक दिली. हि धडक इतकी भिषण होती की या धडकेमध्ये नितीन तिकुडवे, भरत पाटील व बबन पडवळ हे ठार झाले तर अनिकेत पाटील व संकेत शिंदे हे गंभीर जखमी झाले.
याबाबत पाटण पोलिसात पोलीस हवालदार कांबळे यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी मयत नितीन बबन तिकुडवे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुःखामध्ये रिकामटेकडे काम वाढू नका काय साध्य होणार नाही