‘सध्या हवामानातील बदलामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडत आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होत आहे. शिवाय शेतीमाल अल्प मोबदल्यात विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी शेती व्यवसायास पूरक समजला जाणारा दुग्ध व्यवसाय वाढवणे गरजेचे आहे. एकमेव दूध व्यवसाय असा आहे की, या व्यवसायात शेतकर्याला दर दहा दिवसांनी दुधाचा योग्य मोबदला मिळतो व यातून शेतकर्यांची शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावला जाऊ शकतो,’ असे प्रतिपादन हिम्मत देशमुख यांनी केले.
मायणी : ‘सध्या हवामानातील बदलामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडत आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होत आहे. शिवाय शेतीमाल अल्प मोबदल्यात विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी शेती व्यवसायास पूरक समजला जाणारा दुग्ध व्यवसाय वाढवणे गरजेचे आहे. एकमेव दूध व्यवसाय असा आहे की, या व्यवसायात शेतकर्याला दर दहा दिवसांनी दुधाचा योग्य मोबदला मिळतो व यातून शेतकर्यांची शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावला जाऊ शकतो,’ असे प्रतिपादन हिम्मत देशमुख यांनी केले.
अजिंक्य मिल्क प्रोसेसिंग लिमिटेड मायणी, चितळे डेअरी यांच्या संयुक्त विद्यमानाने व बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने गोसाव्याचीवाडी येथील शेतकर्यांना हरियाणा राज्यातील कर्नाळ येथून प्रतिदिन 16 ते 18 लिटर दूध देणार्या 14 दुधाळ म्हशी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी दूध संघाचे संकलन अधिकारी साईनाथ निकम, प्रवीण शिंदे, संदीप कुंभार तसेच गोसाव्याचीवाडी येथील शालिवाहन गायकवाड व शेतकरी बांधव उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ‘चांगल्या जातीची दुधाळ जनावरे पाळणे गरजेचे आहे. यासाठी आमच्या दूध संघाकडून व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शेतकर्यांना मार्गदर्शन करून कोणत्या जातीची जनावरे घ्यावी, याची सखोल माहिती दिली जात असून शेतकर्यांना राज्यासह परराज्यातून दुधाळ जनावरे घेण्यासाठी आर्थिक सहकार्य बँकेच्या माध्यमातून केले जात आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्यांनी गाई, म्हैस खरेदी योजनेचा लाभ घेऊन दुग्ध व्यवसायाकडे वळून आपला व आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला.’