कोविड स्मशानभूमीच्या शेजारील नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या

जयकुमार शिंदे व ग्रामस्थांची प्रांतांकडे निवेदनाद्वारे मागणी
Published:Apr 22, 2021 09:36 AM | Updated:Apr 22, 2021 09:36 AM
News By : Muktagiri Web Team
कोविड स्मशानभूमीच्या शेजारील नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या

कोरोना सारख्या महाभयंकर वैश्‍विक आजारासाठी प्रशासनाने कोळकी येथील स्मशानभूमी अधिग्रहण केली आहे. कोरोनाची पार्श्‍वभूमी मोठ्या प्रमाणात वाढत असताना लोकांचे मयत होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. रोज कोळकीचे स्मशानभूमीमध्ये 8 ते 10 लोकांचे मृत्यू झालेले येत आहेत व त्या ठिकाणी दहन केले जात आहे. यामुळे या परिसरातील वाडी-वस्तीवर महिला, पुरुष व लहान मुलांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. रोज मृत्यूच्या तांडव बघत असल्यामुळे स्मश