गुरसाळे (ता. खटाव) येथील डॉ. प्रशांत लक्ष्मण गोडसे यांच्या शेतास अचानक आग लागून सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांची वित्तहानी झाली आहे.
निमसोड : गुरसाळे (ता. खटाव) येथील डॉ. प्रशांत लक्ष्मण गोडसे यांच्या शेतास अचानक आग लागून सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांची वित्तहानी झाली आहे.
गुरसाळे गावच्या हद्दीतील गट नं. 1615 मध्ये वडूज येथील डॉ. गोडसे यांच्या मालकीची शेतजमीन आहे. या जमिनीलगतच्या एका शेतकर्याने स्वत:च्या शेतातील गवत पेटवले होते. त्या गवताची आग शेजारील गोडसे यांच्या शेतापर्यंत पोहोचली. या आगीत 1 एकर क्षेत्रातील ड्रीप, 280 फुट बोअर गोटा पाईप, 700 फूट केबल, 1 हजार केळीची रोपे, जांभळीची झाडे, तर तोडलेल्या उसाच्या काही मोळ्या जळून खाक झाल्या. तर नारळाच्या रोपांनाही आगीची झळ लागली आहे. या आगीमुळे डॉ. गोडसे यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
गावकामगार तलाठी साळुंखे, कृषी सहायक भुजबळ यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला.
यावेळी सरपंच हसन शिकलगार, पोलीस पाटील नितीन जाधव, ग्रा. पं. सदस्य सागर झेंडे व मान्यवर उपस्थित होते.