‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला बहुमोल असे संविधान दिले आहे. त्या संविधानातून निर्माण झालेल्या कायद्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळेच आज सर्व भीम अनुयायी शांततेच्या मार्गाने भीमजयंती साजरी करत आहेत, ही खरोखरंच अभिमानाची गोष्ट आहे,’ असे मत बाळासाहेब कांबळे यांनी व्यक्त केले.
मायणी : ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला बहुमोल असे संविधान दिले आहे. त्या संविधानातून निर्माण झालेल्या कायद्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळेच आज सर्व भीम अनुयायी शांततेच्या मार्गाने भीमजयंती साजरी करत आहेत, ही खरोखरंच अभिमानाची गोष्ट आहे,’ असे मत बाळासाहेब कांबळे यांनी व्यक्त केले.
सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ज्यांची ओळख आहे, असे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती अनफळे (ता. खटाव) येथे साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मायणीचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, बाळासाहेब कांबळे, पोलीस पाटील प्रशांत कोळी, स्वप्नील कांबळे, राहुल कांबळे, अंकुश निकाळजे, मोहन कांबळे, दादासो कांबळे, वैभव ताटे, सुरेश कांबळे व सुनील कांबळे उपस्थित होते.
प्रारंभी स्वप्नील कांबळे यांनी सामुदायिक बुद्ध वंदना घेतली व मान्यवरांचे स्वागत केले.
यानिमित्त कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची खबरदारी व नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
राहुल कांबळे यांनी आभार मानले.