कोरेगाव विधानसभा मतदार संघातील कोरेगाव, सातारा व खटाव तालुक्यांतील विविध गावांमधील मूलभूत सुविधांच्या कामासाठी 25/15 मधून पाच कोटी रुपयांची तरतूद ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. आ. शशिकांत शिंदे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कुमठे : कोरेगाव विधानसभा मतदार संघातील कोरेगाव, सातारा व खटाव तालुक्यांतील विविध गावांमधील मूलभूत सुविधांच्या कामासाठी 25/15 मधून पाच कोटी रुपयांची तरतूद ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. आ. शशिकांत शिंदे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी खालील गावांमध्ये निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याची गावनिहाय माहिती कंसात निधीची रक्कम पुढीलप्रमाणे : कोरेगाव तालुका : भक्तवडी (10 लाख रुपये), होलेवाडी (10 लाख रुपये), भोसे (5 लाख रुपये), सांगवी (10 लाख रुपये), खडखडवाडी (10 लाख रुपये), रुई (10 लाख रुपये), बोधेवाडी (10 लाख रुपये), दुघी (10 लाख रुपये), बिचुकले (10 लाख रुपये), भाकरवाडी (10 लाख रुपये), शेंदुरजणे (10 लाख रुपये), खामकरवाडी (10 लाख रुपये), अरबवाडी (10 लाख रुपये), त्रिपुटी (10 लाख रुपये), रामोशीवाडी (10 लाख रुपये).
सातारा तालुका : शिवथर (15 लाख रुपये), जाधववाडी (10 लाख रुपये), अंगापूर-धारणवस्ती (10 लाख रुपये), चिंचनेर संमत निंब (10 लाख रुपये), वर्णे (15 लाख रुपये), निगडी तर्फ सातारा (10 लाख रुपये), फडतरवाडी (10 लाख रुपये), जैतापूर (10 लाख रुपये).
खटाव तालुका : डिस्कळ (10 लाख रुपये), खातगूण (10 लाख रुपये), मोळ-अरुण वाघ वस्ती (10 लाख रुपये), धारपुडी (10 लाख रुपये), विसापूर (10 लाख रुपये), रणशिंगवाडी (10 लाख रुपये), चिंचणी (10 लाख रुपये), वर्धनगड (10 लाख रुपये), रेवलकरवाडी (10 लाख रुपये).
सामाजिक सभागृह बांधण्यासाठी खालील गावांमध्ये निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याची गावनिहाय माहिती कंसात निधीची रक्कम पुढीलप्रमाणे : कोरेगाव तालुका : नागेवाडी (10 लाख रुपये), कुमठे-धारनाथनगर (15 लाख रुपये), हासेवाडी (7 लाख रुपये). सातारा तालुका : वासोळे (10 लाख रुपये), खेड-देशमुखनगर (12 लाख रुपये), पाटखळ (15 लाख रुपये), मालगाव (12 लाख रुपये), देगाव (12 लाख रुपये). खटाव तालुका : वेटणे (15 लाख रुपये).
ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी खालील गावांमध्ये निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याची गावनिहाय माहिती कंसात निधीची रक्कम पुढीलप्रमाणे : सातारा तालुका : गोवे (10 लाख रुपये), बसाप्पाचीवाडी (12 लाख रुपये). खटाव तालुका : मांजरवाडी (10 लाख रुपये).
त्याचबरोर महागाव येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणासाठी 15 लाख रुपये, सोनगाव संमत निंब येथे मुस्लीम समाज दफनभूमीस संरक्षण भिंत बांधण्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आ. शशिकांत शिंदे यांनी दिली.