फलटण नगरपरिषदेमध्ये काम करणार्या दोन सफाई कर्मचार्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने नगरपरिषदेमध्ये एकच खळबळ उडाली असून, फलटण नगरपरिषद कार्यालय चोवीस तासांकरिता बंद करण्यात आले आहे.
फलटण : फलटण नगरपरिषदेमध्ये काम करणार्या दोन सफाई कर्मचार्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने नगरपरिषदेमध्ये एकच खळबळ उडाली असून, फलटण नगरपरिषद कार्यालय चोवीस तासांकरिता बंद करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महसूल, आरोग्य, पोलीस व नगरपरिषदमधील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रण कमी काम करणार्या अधिकारी व कर्मचार्यांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात दिल्या होत्या. त्यानुसार आज बुधवार, दि. 12 रोजी महसूल, आरोग्य, पोलीस व नगरपरिषद विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली.
यामध्ये नगरपरिषदेच्या दोन कर्मचार्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, एकजण सफाई कर्मचारी मुकादम व दुसरा सफाई कामगार या पदावर काम करत आहे. त्यामुळे नगरपरिषद कार्यालय 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आले असून, नगरपरिषद निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या दोन्ही कर्मचार्यांच्या निकट संपर्कातील लोकांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहेत. उर्वरित अधिकारी व कर्मचार्यांचीही पुढील दोन ते तीन दिवसांत रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितले.