कासेगाव हद्दीत महामार्गालगत पडलेले झाड धोकादायक
News By : वाठार | सुरेश माने
कासेगाव ता. वाळवा या गावच्या हद्दीत पडलेले झाड वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. सातारा सांगली जिल्ह्याची हद्द ते कासेगाव दरम्यान अवकाळी पावसामुळे उन्मळून पडलेले झाड वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत. हे पडलेले झाड महामार्गालगत पडल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पडलेल्या झाडाचा काही भाग साईट पट्टीवर आल्याने प्रवास करताना अपघात घडून दुचाकीस्वारांना दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याबाबत रस्ते देखभाल विभागाने दुर्लक्ष केले आहे.रस्ते देखभाल विभागाने पडलेले झाड बाजूला काढणे गरजेचे होते मात्र याकडे रस्ते देखभाल विभागाने डोळेझाक केली आहे. या झाडांमुळे अपघात घडण्याची शक्यता अधिक आहे.सातारा सांगली जिल्हा हद्दीपासून कासेगाव पर्यत कालबाह्य झालेली अनेक झाडे सेवा रस्ता अथवा महामार्गावर आहेत.ती झाडे पावसाळ्यात पडण्याची शक्यता आहे त्यामुळे ती धोकादायक झाडे काढणे गरजेचे आहे.अन्यथा या पावसाळ्यात ती झाडे पडून वहातूक टप्प होण्याची किंवा अपघात होण्याची शक्यता आहे.याबाबत रस्ते देखभाल विभागाने ही धोकादायक ठरत असलेली झाडे पावसाळ्यापुर्वी काढण्याची गरज आहे.एकीकडे साईट पट्टीचा वापर दुचाकी स्वारांनी करावा अस संबंधित विभागाकडून सांगितलं जातं असले तरी महामार्गाच्या साईट पट्टीची झालेली दुरवस्था दयनीय आहे. साईट पट्टीवर मातीचा थर साचल्याने दुचाकी घसरण्याची शक्यता आहे.तर काही ठिकाणी तर साईट पट्टीचा रस्ता एक सारखा नसल्याने दुचाकी घसरत आहेत. तर काही ठिकाणी साईट पट्टी रस्त्याला मोठ्या भेगा पडलेल्या आहेत.या साईट पट्टीचा ये-जा करण्यासाठी वापर करताना जरा सावधान असं म्हणण्याची वेळ वाहनधारकांना आली आहे.


