परीट (धोबी) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरिता सामाजिक न्याय विभाग केंद्र सरकार यांनी पाठवलेल्या प्रपत्रामध्ये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने विहित प्रपत्रामध्ये राज्य शासनाने माहिती भरून पाठवण्याबाबतचे निवेदन फलटण तालुका व शहर परीट (धोबी) समाजाच्यावतीने उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांना दिले आहे.
फलटण : परीट (धोबी) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरिता सामाजिक न्याय विभाग केंद्र सरकार यांनी पाठवलेल्या प्रपत्रामध्ये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने विहित प्रपत्रामध्ये राज्य शासनाने माहिती भरून पाठवण्याबाबतचे निवेदन फलटण तालुका व शहर परीट (धोबी) समाजाच्यावतीने उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांना दिले आहे.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, उपविभागीय कार्यालयीन अधीक्षक चांदवड व समाजबांधव उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) समाज आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार राज्य सरकारने अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याकरिता केंद्र सरकारने पाठवलेल्या प्रपत्राची माहिती भरून त्वरित केंद्र सरकारकडे पाठवावी व परीट समाजास न्याय मिळवून द्यावा, असे निवेदन जिल्हा व तालुका पातळीवर प्रांताधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे देण्यात यावे.
त्या आदेशाचे पालन करून येथील ज्येष्ठ समाज बांधव ज्ञानेश्वर ननवरे, दिलीप ननवरे, अनिल ननवरे, राजेंद्र राक्षे, फलटण तालुका परीट समाज संघटनेचे अध्यक्ष हेमंत ननवरे, राहुल सोनटक्के, प्रशांत शिंदे, संतोष ननवरे, राजेंद्र ननवरे, अक्षय तळेकर, वैभव ननवरे, रितेश ननवरे, दादा ननवरे, मयूर हजारे आदी समाजबांधव उपस्थित होते.
त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य नाभिक समाज संघटना फलटण यांच्यावतीने या निवेदनास पाठिंबा देत असल्याचे पत्र अध्यक्ष हेमंत ननवरे यांना देण्यात आले.