कराड : कराड शहराबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थ्यांना अक्षरसंस्काराचे धडे देणारे अक्षर संस्कार इन्स्टिट्यूटचे राहुल पुरोहित यांचा अक्षरांचा जादूगर या पुरस्काराने सन्मान झाला. शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यात्म गुरु इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते हा गौरव कराड येथे न्यूज लाईन सन्मान सोहळ्यात संपन्न झाला. यावेळी सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन राजमाने, प्रांताधिकारी उत्तम दिघे, प्रमोद तोडकर, सागर बर्गे आदींची प्रमुख उपस्थिती होती. देशमुख म्हणाले, अक्षरांना सौंदर्याचा स्पर्श होताच शब्दांचे रूप खुलून येते. लिखाणालाही मोठा अर्थ प्राप्त होतो. वळणदार हा शब्दच मुळात व्यापक सौंदर्य आणि सदगुणांचे प्रतिरूप आहे वळणदार आणि सुंदर हस्ताक्षर हे साक्षात से भगवान श्रीकृष्णाचे रूप अशी आपली श्रद्धेची भावना. ज्याप्रमाणे मोरपीस पाहताच मनाला होणारा आनंद अवर्णनीय असतो. त्याच आनंदाचे अनुभूती यावे असे आपले सुंदर हस्ताक्षर अशाच अक्षर सौंदर्याची आनंदही उधळण सकलांवर व्हावी याबाबत आपला कटाक्ष असतो. प्रत्येकाचे हस्ताक्षर वळणदार व सुंदर बनावे असा ध्यास घेऊन अक्षरांना सौंदर्याचे पैलू पाडण्यासाठी अथकपणे आणि सातत्यपूर्ण असणाऱ्या प्रयत्नांमुळे अक्षरांचा जादूगर हा पुरस्कार सन्मान होतोय. यावेळी प्राचार्य मोहन राजमाने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमोद तोडकर यांनी प्रास्ताविक केले. सागर बर्गे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कराड शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.