मालखेड ता.कराड येथील श्री.हनुमान यात्रा सालाबादप्रमाणे दि.३मे पासून पालखी सोहळ्याने सुरुवात होत आहे. मंगळवार दि.३रोजी सायकांळी ५.०० वा.हळदी कुंकू व सायंकाळी ६.०० वा पालखी सोहळा तर बुधवार दि.४ मे रोजी यात्रेचा मुख्य दिवस असे कार्यक्रम होणार आहेत.अशी माहिती श्री.हनुमान यात्रा कमिटी मालखेड यांनी दिली आहे. तरी श्री.हनुमान यात्रेतील पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.