फलटण शहरातील भर बाजारपेठेत एका कापड दुकानदाराने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ‘हम करे सो कायदा’ या उक्तीप्रमाणे जुन्या इमारतीची तोडफोड करीत अनधिकृतपणे मुख्य रस्त्यांपर्यंत लोखंडी जिना टाकला असल्याचे वृत्त दै. ‘मुक्तागिरी’ने प्रसिद्ध करताच संबंधित जिना पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी आदेश देताच पालिकेच्या अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी काढून टाकला असून, दै.‘ मुक्तागिरी’च्या वृत्ताचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.
फलटण : फलटण शहरातील भर बाजारपेठेत एका कापड दुकानदाराने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ‘हम करे सो कायदा’ या उक्तीप्रमाणे जुन्या इमारतीची तोडफोड करीत अनधिकृतपणे मुख्य रस्त्यांपर्यंत लोखंडी जिना टाकला असल्याचे वृत्त दै. ‘मुक्तागिरी’ने प्रसिद्ध करताच संबंधित जिना पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी आदेश देताच पालिकेच्या अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी काढून टाकला असून, दै.‘ मुक्तागिरी’च्या वृत्ताचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.
फलटण शहरातील आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक चौक ते गजानन चौक या मार्गावरील एका इमारतीमध्ये कापड व्यापार्याने फलटण नगरपालिकेत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ‘हम करे सो कायदा’ या उक्तीप्रमाणे थेट जिना अतिक्रमण करीत तो मुख्य रस्त्यावर उतरवला होता. इथं गोरगरीब लोकांची अतिक्रमणे कोरोनामध्ये ही काढली. मात्र, मोठ्या धेंडांची अतिक्रमणे तशीच ठेवली असल्याने पालिका अधिकारी व प्रशासन यांना सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती.

या अतिक्रमणाचे वृत्त दै.‘मुक्तागिरी’ने सोमवार, दि. 5 एप्रिल रोजी प्रसिद्ध करताच मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दखल घेतली व तो जिना काढून टाकण्यात यावा असा आदेश दिला.
यानंतर शहर अभियंता पंढरीनाथ साठे, नगर रचनाकार पाटील व बांधकाम विभागाचे काळबेरे व इतर अधिकारी व कर्मचार्यांनी तो अतिक्रमण केलेला जिना जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकला असून, या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे. इतर ही शहरातील अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.