कृषी विभाग व बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन

गोरेगावच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा निवेदनाद्वारे इशारा
Published:Aug 13, 2020 12:56 PM | Updated:Aug 13, 2020 12:56 PM
News By : Muktagiri Web Team
कृषी विभाग व बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन

गोरेगाव (निमसोड) ता. खटाव येथील कृषी विभाग व बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीकरिता गावातील प्रमुख कार्यकर्ते शनिवार, दि. 15 ऑगस्ट रोजी वडूज येथील तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत.