श्वानांची स्पर्धा ही दर्शकासाठी पर्वणी : रामकृष्ण वेताळ
मेरवेवाडी येथे श्वान स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
Published:Sep 15, 2021 09:06 AM | Updated:Sep 15, 2021 09:06 AM
News By : Muktagiri Web Team
डोळ्याचे पारणे फेडणारे विविध जातीचे श्वान अनेक जातीचे,विविध आकाराचे,केसाळ लांब कानाचे मजबूत शरीर यष्टीचे असे अनेक श्वान येथे पाहायला मिळत होते.मालकांचे प्रेम आणि श्वानांची चपळता हे पाहणे ही पर्वणी होती ग्रामीण भागात हे पाहायला मिळाल्याने लोकांचा आनंद ओसंडून वाहत होता.
ओगलेवाडी : कोरोना या जागतिक संकटामुळे विविध स्पर्धेसह सर्व कार्यक्रम सध्या बंद आहेत. मेरवेवाडी (ता.कराड) या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून होत असलेली हि स्पर्धा सध्या लोकांसह श्वान मालकांसाठी पर्वणी साबित होणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ यांनी केले. मेरवेवाडी येथील श्वान स्पर्धेसाठीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच सुहास यादव, उपसरपंच सतीश खोत, अशोक साळुंखे, सचिन निकम आणि रणजीत यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. राजदीप यादव याच्या वाढदिवसानिमित्त या श्वान स्पर्धेचे आयोजन केले होते. सातारा सांगली सोलापूर सह विदर्भ आणि बाहेरील राज्यातून दीडशे पेक्षा जास्त श्वान या स्पर्धेत सहभागी झाले होते. श्री. वेताळ म्हणाले, बैलगाडा सह सर्व स्पर्धेवरील बंदी शासनाने तत्काळ मागे घ्यावी आणि खुल्या वातावरणात सर्व स्पर्धा पार पाडाव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जोश, उल्हास, वेग, चपळता आणि वेग याचा थरारक अनुभव या वेळी लोकांना अनुभवता आला. यावेळी अशोक साळुंखे विनय मोहिते अमर पाटील या सह महाराज ग्रुपचे सर्व सदस्य आणि श्वान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.