शिकारीच्या अनेक घटना या विभागात घडल्या आहेत. परंतु कोणतीच ठोस कारवाई अथवा दोषारोपपत्र दाखल झाल्याचे कधीही निदर्शनास आलेले नाही. शिकार करा व मोकाट फिरा अशी काही शी माणसीकता लोकांच्या मनी आहे. वन्यजीव व वनविभागा सर्वसामान्य जनतेला एक न्याय व धनदांडग्या नां दुसरा न्याय अश्या भूमिकेत आहे याचा अनुभव डोंगरमाथ्यावरील अनेक लोकांच्या पाठीशी आहे.
पाटण तालुक्यातील कोयना भागामध्ये नाव गावातील काही ग्रामस्थांनी सांबर या प्राण्यांची शिकार केली. त्याचे मांस शिजत असल्याची गुप्त माहिती वन्यजीव विभाग हेळवाक ला समजता त्यांनी पाच लोकांवरती कारवाई केली. याबाबत अधिक माहिती, कोयना परिसरामध्ये अनेक वन्यप्राणी आहेत. गावपातळीवरती अनेक लहान मोठ्या शिकार होत असतात. नाव गावामध्ये दोन दिवसांपूर्वी सांबर प्राण्यांची शिकार सापडली आणि त्याचे मांस एका घरामध्ये शिजवले जात होते. या घटनेची गुप्त माहिती हेळवाक वन्यजीव विभागालख समजताच त्यांनी सापळा रचून रंगेहाथ लोकांना पकडले. तद्नंतर घटनास्थळी शिजत असलेले सांबराचे मांस आणि पाच लोकांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान हे पाच ही नाव गावातील आरोपी सहकार्य करत नसल्याने तपासात अनेक अडचणी आल्या. अद्याप तपास अपूर्ण स्वरूपात असून या शिकारीच्या पाठीमागे अनेक हात असण्याची शक्यता आहे. सदर पाच आरोपींना शुक्रवार दि. 17 रोजी पाटण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पीसीआर दिली आहे. या घटनेचा अधिक तपास वन्यजीव विभाग हेळवाक चे वनक्षेत्रपाल संदीप झोपळे करत असून या कारवाई मध्ये वन्यजीव हेळवाक चे अधिकारी व कर्मचारी यांचें सहकार्य लाभले अशी माहिती झोपळे यांनी दिली.