पुसेगावात विनामास्क फिरणार्‍यांना पोलिसांचा दंडुका

26 जणांवर कारवाई : सात हजारांचा दंड वसूल; मास्क लावण्याचे आवाहन 
Published:Apr 04, 2021 08:58 PM | Updated:Apr 04, 2021 08:58 PM
News By : Muktagiri Web Team
पुसेगावात विनामास्क फिरणार्‍यांना पोलिसांचा दंडुका

प्रशासनाने आवाहन करून देखील पुसेगाव (ता. खटाव) बाजारपेठेत कोणत्याही नियमाचे पालन न करता नागरिक बिनधास्त वावरत असल्याने या ठिकाणी कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. येथील वाढत्या कोरोना आलेखाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने शुक्रवार (दि. 2) पासून पुसेगावसह परिसरात विनामास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली.